Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




पाहणे किंवा विश्वास ठेवणे?

SEEING OR BELIEVING?
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 4 जानेवारी, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, February, 2018

“त्याला पाहिले नसतांहि त्याच्यावर तुम्ही प्रीति करिता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवतां; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण तें उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता” (I पेत्र 1:8, 9).


पेत्र ज्यांनी येशूला कधीच पाहिले नाही त्या लोकांविषयी बोलला. तो पृथ्वीवर असतांना त्यांनी त्याला कधीच पाहिले नव्हते. तरीहि त्याच्याद्वारे त्यांचे तारण झाले. येशू पृथ्वीवर असतांना पुष्कळांनी त्याला पाहिले. तरीहि त्यांचे तारण झाले नाही. स्पर्जन जे कांही म्हणाले ते आपण खात्रीने म्हणू शकतो — “पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे नव्हे, परंतू विश्वास ठेवणे म्हणजे पहाणे होय.” ते स्पर्जनच्या उपदेशाचे शिर्षक होते. ते आपल्याच उता-यावर बेतले होते. तुमच्यासाठी मी स्पर्जनचा उपदेश सोपा करुन सांगणार.

I. प्रथम, पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे नव्हे.

ते जाणून घेण्यासाठी तुम्हांला पवित्रशास्त्र खूप माहित असण्याची गरज नाही. सर्व चार शुभवर्तमाने ही येशूला ज्यांनी पाहिले त्यांची आहेत. त्यांनी त्याला पाहिले, परंतू त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यहुदा इस्कोर्योत हा एक येशूचा शिष्य होता. परंतू यहुदाने येशूवर विश्वास ठेवला नाही. यहुदाने येशूचे तीन वर्षे शिष्यत्व केले. तो येशूबरोबर राहिला. तो येशूबरोबर जेवला. त्यांने येशूच्या नावांने भूते काढली. त्यांने येशूविषयी प्रचार केला. त्याला ठाऊक होते की येशू खूप जवळचा होता. येशूसुद्धा त्याला आपला मित्र संबोधित असे. परंतू यहुदाचा येशूवर बिल्कुल विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांने चांदीच्या तीस नाण्याकरिता विश्वासघात केला. त्यामुळे त्यांने बोहेर जाऊन स्वत: फाशी घेतली, व नरकात गेला. इतर शिष्यहि कांही खूप चांगले होते असे नव्हते. ते सुद्धा येशूवर विश्वास ठेवीत नव्हते. येशूने त्यांना तो दु:खसहन करावयास व मरावयास जात आहे हे सांगितले. “त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही...अथवा सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक 18:34). येशूने त्यांना फुंकर टाकून आत्मा दिला नाही तोवर त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही (योहान 20:22). पुनरुत्थानानंतरहि शिष्य थोमाने येशूवर विश्वास ठेवला नाही! ते येशूबरोबर तीन वर्षे राहिले. परंतू त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पिलाताने त्याला पाहिले, परंतू त्यांने विश्वास ठेवला नाही. परुश्यांनी चमत्कार करतांना पाहिले परंतू त्यांनी विश्वास ठेवला नाही. सदुकी व हेरोद त्याच्याशी बोलले, परंतू त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांने मोठ्या लोकसमुदयास खाऊ घातले, आणि त्याला अद्भूते करतांना पाहिले. परंतू त्यातील पुष्कळांनी विश्वास देखील ठेवला नाही. तो पृथ्वीतलावर असतांना त्याला त्यांच्यातील क्वचितच कोणीतरी पाहिले! क्वचितच कोणीतरी! हे एक आश्चर्य चकीत सत्य आहे! अशाप्रकारे आश्चर्य चकीत झालेला योहान त्याच्याविषयी लिहतो. योहान म्हणाला, “जे त्याचे स्वत:चे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी स्विकार केला नाही” (योहान 1:11). अगदी थोडके आहेत ज्यांनी त्याला पाहिले त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

ह्या सत्यातून आपणांस कळते की “पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे नव्हे.” अजूनहि आज रात्री तुमच्यातील कोणाला तरी वाटते की त्याला आपण पाहू तर मग विश्वास ठेवू. तुम्ही ते कबूल करीत नाही, परंतू ते सत्य आहे. त्यामुळे येशू सत्य आहे हे सिद्ध करण्यास तुम्हांस “जाणीव” व्हावीशी वाटते. तुम्ही “संवेदना” किंवा ज्यात अभिवचन आहे असे पवित्रशास्त्रातील वचनाचा शोध घेता. तुम्ही संवेदना समजून घेऊ शकता. तुम्ही पवित्रशास्त्रातील वचनाचा शोध घेऊ शकता. परंतू तुम्ही येशूला पाहू शकत नाही. त्याच्यावर विश्वास न ठेवण्याचा तुमचा एक बहाणा होय. त्याच्यावर भरवंसा न ठेवण्याचा तुमचा एक बहाणा होय. त्याच्यावर विश्वास न ठेवण्याचा तुमचा एक बहाणा होय. तारण न होण्याचा तुमचा एक बहाणा होय. परंतू, मी तुम्हाला एक सांगतो की “पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे नव्हे.” कांहीतरी वाटणे म्हणजे विश्वास ठेवणे नव्हे. पवित्रशास्त्रातील अभिवचने पुनरुच्चारित करणे म्हणजे विश्वास ठेवणे नव्हे. अद्भूते पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे नव्हे. मी उल्लेखिलेल्या सर्व अविश्वासणा-यांना पविशास्त्रातील वचनें माहित आहेत. त्या सर्वांनी त्याला पाहिले. जवळजवळ सर्वांनी त्याला अदभूत कार्ये करतांना पाहिले आहे. तरीहि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यातील पुष्कळसे मरण पावले व नरकांत गेले कारण त्याला त्यांनी पुष्कळ वेळा पाहिले तरीहि, त्यांनी त्याच्यावर कधीहि विश्वास ठेवला नाही.

येशूविषयी यशया संदेष्टा म्हणतो, “तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला असा तो आहे” यशया 53:3´. बार्नेज टिप्पणी म्हणतात,

तो तुच्छ मानिलेला...परुशी, सदुकी, व रोमी सैनिकांकडून उद्धारकर्ता अपमानित व तिरस्कारला जात होता. त्याच्या पृथ्वीवरील जीवनात, त्याच्या मरणात; आणि त्यानंतरहि, त्याचे नाव आणि त्याचे व्यक्तिमत्व अपमानित होत आहे.

मनुष्यांनी नाकारलेला...वाक्याला खूप महत्व आहे, आणि ह्या तीन शब्दातून मनुष्याची उद्धारकर्त्याप्रति वर्तुणूक दर्शविते. “मनुष्यां [नी] नाकारलेला” हे शिर्षक सर्व दु:ख आणि खिन्नता प्रकट करील; यहुद्यांनी, श्रीमंतानी, महनीय व सुशिक्षीत लोकांनी, सर्व स्तरातील समुहाच्या, व वयाच्या, व पदाच्या लोकांनी नाकारलेला.

पुलपीठ कॉमेंट्री म्हणते,

त्याला तुच्छ लेखिले. जे कांही शिक्षणाकडे थोडे लक्ष दिले आहे त्यात माणसांचा अपमान दर्शविला होता, वधस्तंभावर खिळण्यापूर्वी रात्रंदिवस त्याला त्यांनी दिलेली वर्तणूक दर्शविली होती. मनुष्यांनी त्यागलेला, त्याऎवजी नाकारलेला...आमच्या प्रभूकडे “थोड्या लोकां” पेक्षा जास्त कांही वेळ आमच्या प्रभूकडे नव्हते. त्यांच्यातील, “पुष्कळ मागे गेलेत व पुन्हा ते त्याच्याबरोबर नव्हते.” कांहीजण केवळ रात्रीचे त्याच्याकडे यायचे. सर्व “राजकर्ते” व महनीय व्यक्ति त्याच्यापासून अलि प्त रहायाचे. सरतेशेवटी तर त्याचे शिष्य सुद्धा “त्याला सोडून पलायन केले.”

येशू भूतलावर असतांना ज्यांनी त्याला पाहिले जवळजवळ त्या सर्वांनी त्याला तुच्छ लेखिले व नाकारले. तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहांत काय? तुमचे परिवर्तन झाले नाही तर, तुम्ही अगदी त्यांच्यासारखेच आहांत! तुम्ही त्याला तुच्छ लेखिता व नाकारता. तुम्ही त्याच्यापासून आपली तोंडे लपविता. ज्यांनी येशू भूतलावर असतांना पाहून त्याला नाकारले तुम्ही अगदी त्यांच्यासारखेच आहांत! त्यांनी त्याला पाहिले. त्यांनी त्याचा आवाज ऐकला. तरीहि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे नव्हे!

II. दुसरे, पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे!

“त्याला पाहिले नसतांहि त्याच्यावर तुम्ही प्रीति करिता; आता तो दिसत नसतां त्याच्यावर विश्वास ठेवतां; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवाचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्च गौरवयुक्त आनंदाने उल्लासता” (I पेत्र 1:8, 9).

आपल्या उता-यात पेत्र ज्या लोकांविषयी बोलतोय त्यांनी येशूला भूतलावर कधीहि पाहिले नाही. तरीहि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याच्याद्वारे तारण पावले! येशूला कधीहि पाहिले नाही, त्याचा आवाज ऐकला नाही, आणि त्याला कधीहि स्पर्श केला नाही तरीहि त्याच्यावर त्यांनी विश्वास का ठेवला? महान सुधारक केल्विन यांनी उत्तर दिले आहे. केल्विन म्हणाले, “आपल्या स्वत:च्या बुद्धीने... कोणताहि मनुष्य समर्थ नाही जोवर परमेश्वर [त्याला] सुधारणूक आणि त्याला त्याच्या आत्म्याने नूतनीकरण करीत नाही.”

तोच आत्मा येशूमध्ये तुम्हांला विश्वास देतो. आता — तुम्ही त्याला तुमच्या डोळ्यांने पाहू शकला नाही तरी. आता त्याच्या देहाचा स्पर्श जाणवला नाही — तरी तोच आत्मा येशूच्या संपर्कात आणू शकतो.

येशूबरोबरचा संपर्काचा पहिला बिंदू प्रेम आहे. आपला पुढचा उतारा म्हणतो, “ज्याला तुम्ही पाहिले नाही, तरीहि तुम्ही प्रेम करिता.” “त्याला तुम्ही पाहिले नाही तरी, त्याच्यावर प्रेम करिता.” येशूचे प्रेम पुष्कळ मार्गानी आपल्याकडे येते. मी जेव्हां मंडळीस जायचो तेव्हां माझे नातेवाईक माझी चेष्टा करीत. आणि ते येशूची सुद्धा चेष्टा करीत. ते म्हणाले, “तूं त्याच्यावर कसा काय विश्वास ठेऊ शकतो? त्यांने तुझ्यासाठी काय केले?” परंतू जेवढे अधिक ते येशूवर हसले, तेवढे अधिक मी त्याच्यावर प्रेम केले. तेथे माझ्या मंडळीत कांही वाईट मुले सुद्धा होती. त्याची आई कुमारिका नसल्याबद्दल ते घाणरडे विनोद करीत. तो अनौरस आहे असे तो म्हणत. ते त्याच्यावर हसत. परंतू जेवढे ते त्याच्यावर हसत, तेवढा अधिक मी त्याच्यावर प्रेम करी.

जेव्हां मी इस्टर समयी येशूचा करितो तेव्हां मी अधिक त्याच्यावर प्रेम करितो. त्यांने वधस्तंभावरच्या दु:खसहनाबद्दल प्रेम करितो. त्याच्या हाता पायात खिळे ठोकले ह्या विचाराचा मला तिटकारा आहे. मला कळत नाही त्याच्याबद्दल लोक असे का वागतात. परंतू त्याच्याबद्दल मला मोठी दया येते व दु:ख वाटते.

मी एकटा मुलगा होतो. मला सुरक्षित व सुखी ठेवण्यास माझे आईवडील माझ्याजवळ नव्हते. मी विचार केला येशूहि एकटा आहे — मित्राशिवाय त्याला सांत्वना देण्यास — व मी त्याच्यावर प्रेम केले. मला वाटले, “तुझ्यावर कुणी प्रेम केले नाही तरी, येशू, मी तुझ्यावर प्रेम करीन!” आणि हे त्याचे प्रेम होते की त्याने माझा जीव जिंकला. ज्या दिवशी माझे तारण झाले त्यादिवशी त्यांनी चार्ल्स वेस्ली यांचे गीत गायले. कडव्याच्या शेवट ज्या शब्दाने होत होता त्यांने माझे ह्दय भंग पावले. “अद्भूत प्रेम, हे कसे शक्य आहे, की, माझा देवाने, माझ्यासाठी मरण पत्करावे.” “अद्भूत प्रेम, हे कसे शक्य आहे, की, माझा देवाने, माझ्यासाठी मरण पत्करावे.”

मानवी देहात येशू हा देव होता. त्यांनी माझ्या देवाला खडबडीत वधस्तंभावर खिळले. “अद्भूत प्रेम.” त्यांने माझे ह्दय भंग पावले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. माझ्यासाठी असलेल्या त्याच्या प्रेमाने — आणि त्याच्यासाठी असलेल्या माझ्या प्रेमाने मी त्याच्या संपर्कात आलो.

मला वाटते येथे कोणीहि जॉन कागॅन यांना भेकड म्हणणार नाही. तुम्ही जॉनच्या समर्थ व्यक्तीमत्वाकरिता त्याचा आदर करता. जॉनने सर्व शक्तीनिशी ख्रिस्ताचा प्रतिकार केला. नेलेल्या चौकशी खोलीमध्ये मी त्याला कांहीहि विचारले नाही. तो म्हणाला, “येशूला सोडून देण्यासंबंधीच्या विचाराने मला इतके दु:खीत केले की ते अनंतकाळासाठी आहे की काय जे मला शक्य नव्हते. येशूने माझ्यासाठी आपला प्राण दिला. मी त्याचा शत्रू असतांना येशू वधस्तंभावर खिळला गेला, आणि मी त्याला कांही प्रतिफळ देत नाही. या विचाराने मला तोडले. मला अधिक काळ धीर धरवत नव्हता. मला येशू हवा होता. मी त्याक्षणी त्याला प्रतिफळ दिले आणि मी विश्वासाने येशूकडे आलो...मला भावनेची गरज नव्हती. माझ्याकडे ख्रिस्त होता!...माझ्यासारख्या लायक नसलेल्या पाप्यास येशू कसा काय क्षमा करु शकतो. ख्रिस्ताने माझ्यासाठी आपला प्राण दिला आणि त्याकरिता मी त्याला माझे सर्वस्व देतो...येशूने माझा द्वेष व राग आणि त्याऐवजी त्यांने मला प्रेम दिले.”

महान स्पर्जन जॉन कागॅनला कधीहि भेटले नाहीत. परंतू असे कांही लिहले की ते जॉनला ओळखित होते. स्पर्जन म्हणाले, “शेवटी ते पाहणे नव्हे — ते नेहमी बाह्यात्मक असले पाहिजे — ते येशूविषयी विचार करणे, समजून घेणे, त्याचा आपल्यावर परिणाम होणे, जो की संपर्काचा खरा बिंदू आहे. म्हणून, ख-या अर्थाने एकसंघ होण्यास, स्पर्शाहून अधिक अतूट बंधनासाठी ख्रिस्तावर प्रेम करा...प्रेम तारणा-यास अंत:करणात वास्तवात आणते...अशाप्रकारे जे प्रेम आहे ते ख्रिस्त व तुमच्या आत्म्यातील बंधन जे तुम्ही स्पर्श करता किंवा अनुभवता त्यापेक्षा अधिक वास्तववादी बनविते.” “तुम्ही त्याला पाहत नाही तरी, त्याच्यावर प्रेम करिता.”

परंतू हा उतारा येशूबरोबरच्या संपर्काचा आणखी एक बिंदू देतो — “ज्याच्यामध्ये, तुम्ही त्याला पाहत नाही, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता.” “तरीहि तुम्ही विश्वास ठेवता.” तुम्हांला एक सत्य पुन्हा एकदा आठवण करतो की तुम्ही येशूला पाहिल्यावाचून विश्वास ठेवू शकता. “तुम्ही त्याला पाहत नाही, तरी विश्वास ठेवता, तुम्ही आनंद करिता...” तरीहि विश्वास ठेवता! तरीहि विश्वास ठेवता! ज्या लोकांना पेत्राने पत्र लिहले ते येशूला जाणत नव्हते. त्यांना येशूचा अनुभव नव्हता. त्यांनी त्याचा आवाज कधीहि ऐकला नव्हता. परंतू ते त्याला ओळखित होते! “तुम्ही त्याला पाहत नाही, तरी विश्वास ठेवता, तुम्ही आनंद करिता.” “तुम्ही त्याला पाहत नाही, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता.”

हेलन केलर ह्या पूर्ण अंध व बहि-या जन्माला आल्या होत्या. अँनि सुलिवॅन या बाईनी तिला कसे बोलावे हे शिकविले. ही एक खूप अद्भूत कथा आहे. मी लहान मुलगा असतांना हेलन किलर यांचे रेडिओवर भाषण ऐकले. जन्मपासून त्या पूर्ण अंध व बहि-या असल्या तरी, हेलन किलर येशूवर विश्वास ठेवीत! तुम्हा त्याला पाहू किंवा ऐकू शकत नसला तरी — तुम्ही सुद्धा येशूवर विश्वास ठेवू शकता!

येशूवर विश्वास ठेवणे तुम्हांला त्याच्या संपर्कात आणते. प्रेम व विश्वास हे दोन्ही येशूबरोबरच्या संपर्काचे बिंदू आहेत. प्रेम व विश्वास हे आपणास तारणा-याशी एकसंघ करते. “ज्याला तुम्ही पाहिले नाही, त्याच्यावर प्रेम करिता; ज्याच्यामध्ये, त्याला तुम्ही पाहिले नाही, तरीहि विश्वास ठेवता, तुम्ही आनंद करिता.” “तुम्ही त्याला पाहिले नाही तरी, त्याच्यावर विश्वास ठेवता आणि आनंद करिता!”

आमच्या मंडळीची पियानो वादक इमि झबालगा, काय म्हणते ते ऐका. ती एक संवेदनशील महिला आहे. ती काय म्हणते त्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता.

     मी ख्रिस्तावर विश्वास ठेवीत नाही. “येशू” केवळ एक शब्द, एक सिद्धांत, किंवा कोणीतरी मला माहित असलेला पण तरीहि खूप लांबचा आहे. ख्रिस्तासाठी प्रयत्न करण्याऐवजी, मी भावना किंवा विशिष्ट प्रकारचा अनुभव शोधीत होतो.
     एका रात्री उशीरा मला अचानक कळून आले की येशू माझ्या साठी मेला. त्या रात्री मी त्याला गेथशेमाने बागेत, माझ्या पापाच्या ओझ्याने विव्हळतांना आणि घाम गाळतांना पाहतो असे मला [वाटले]. मी [माझ्या मनांत] त्या वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त पाहिला. त्याचे रक्ताचे अर्पण व त्याला भोसकले जाणे हे माझ्या नाकारामुळे झाले असे मला [वाटले]. तरी पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. अजूनहि मी माझी गरज खात्री होण्याशी जोडली होती.
     ख्रिस्ताच्या प्रेमळतेविषयी गीतरत्नातून डॉ. हायमर्स प्रचार करीत होते. जसे मी ऐकत होते, ख्रिस्त अधिक न अधिक प्रेमळ झाला. त्याच्यासाठी मी कष्टी होऊ लागले. मी वचन ऐकले, “माझा वल्लभ मला म्हणाला, माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल” (गीतरत्न 2:10). ख्रिस्त माझ्याशी बोलतोय की, त्याच्याकडे येण्यास मला बोलावित आहे असे मला वाटले.
     मला माहित आहे की जीवनातील विपत्ती, आशाहीनता, जगाच्या थंडाव्यातील रिक्तपणा, पिळून टाकणारे पापाचे ओझे, अशा सर्व अनुभवातून मी गेले, कारण देवाच्या माझ्यावरील प्रेमामुळे आणि येशूसाठी माझी गरज मला मिळावी म्हणून.
      [उपदेश संपल्यावर डॉ. हायमर्सना पाहण्यास] मी गेले. माझ्यापुढे माझ्या पापाची भिंत— माझ्या ह्दयाचा दुष्टपणा, माझ्या मनातील दुष्ट विचार, आणि माझे सततचे येशूला नाकारणे उभे राहिले. मी हे अधिक सहन करु शकत नव्हते. मला ख्रिस्त हवा होता. मला त्याचे रक्त हवे होते. येशूपासून दूर जाणे, आणखी एका खोटे परिवर्तन किंवा चुक करणे, किंवा पूर्वी मी जसे अंधकारात होते तसे भरकटणे याऐवजी...मी माझ्या गुडग्यावर आले. विश्वासाने मी ख्रिस्ताकडे पाहिले...त्याच्या मौल्यवान रक्ताने माझे पाप धुतले; माझे पापाचे ओझे माझ्यापासून दूर केले! माझ्या सर्व पापांची त्याने मला क्षमा केली.
     आता तो माझा नायक, माझा तारक आणि माझा प्रभू आहे! त्यानंतर मी पुष्कळदा मदत, सामर्थ्य व संरक्षण मिळण्यासाठी येशूकडे गेले. गीत चालू असतांना, “दयेने माझे जीवन पुन्हां लिहले./ दयेने माझे जीवन पुन्हां लिहले./ मी पापात हरविलो होतो/ पंरतू येशूने माझे जीवन पुन्हां लिहले.” येशूच्या द्वारे आणखी एका व्यक्तीचे तारण होते तेव्हां मला आता आनंद होतो. पापाची क्षमा झाल्यामुळे जे समाधान व शांति मिळाले ते मी व्यक्त करु शकत नाही...मी आशा करते की माझ्याप्रमाणे जे जीवनात संघर्ष करीत आहेत येशूकडून त्यांना त्यांच्या पापाची क्षमा मिळावी! पूर्वी शुभवर्तमान जे निरस होते ते, आता थरारक झाले, आणि जेव्हां मी येशूविषयीचा उपदेश ऐकते तेव्हां माझे ह्दय आनंदाने व उपकारस्तुतीने भरुन जाते. देवाचे आभार मानते ज्याने त्याचा पुत्र, येशू याच्याकडे मला आणले. प्रेषित पौल जे म्हणाला तेच मी म्हणते, “देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो” (II करिंथ 9:15)!

प्रिय मित्रांनो, ख्रिस्त जोवर मला माहित नव्हता तोवर मला “आनंदाचा” खरा अर्थ मला माहित नव्हता. मी ब-याच संकटातून व कठीण प्रसंगातून गेलो. ज्यावर विश्वास ठेवला त्यांच्याकडून निराशा झाली. मी एकाकी होतो व मी मोठे दु:ख सहन केले. रात्रीचे मी बरेच तास चाललो, प्रत्येक रात्री. मला कोणी मनुष्य मित्र नसल्याने एकटे वाटून “मंद व हिंसक दु:खाचा” अनुभव आला. मी एका परिचीत रात्रीच्या अनुभवातून गेलो. परंतू प्रत्येक वेळी व सर्वदा येशूने दु:खाच्या प्रसंगातून सोडविले. कोणी मला स्विकारीत नाही असे वाटायचे तेव्हां, नेहमी येशूने स्विकारले. “पूर्वी विश्वासाने मी प्रवाह पाहिला/ जखमातून वाहणारा स्त्राव,/ मुक्तीचे प्रेम माझा विषय झाला/ आणि तो मी मरेपर्यंत असणार./ आणि तो मी मरेपर्यंत असणार,/ आणि तो मी मरेपर्यंत असणार,/ मुक्तीचे प्रेम माझा विषय झाला/ आणि तो मी मरेपर्यंत असणार.” तुम्ही अजूनहि हरविलेले आहांत तर हे सुंदर गीत काळजीपूर्वक ऐका.

हजारो प्रकारे मी व्यर्थ प्रयत्न केले
माझ्या भीतीला दडपण्याचा, माझ्या आशा उंचाविण्याचा;
परंतू मला ज्याची गरज आहे, पवित्रशास्त्र सांगते,
सर्वदा, केवळ येशू.

माझा जीव रात्र, माझे ह्दय पोलाद —
मी पाहू शकत नाही, मला जाणीव होऊ शकत नाही;
प्रकाशा करिता, जीवना करिता, मला विनंती करावी लागेल
येशूकडे साध्या विश्वासाने.

तो मेला, तो जगतो, तो राज्य करतो, तो मध्यस्ती करतो;
त्याच्या लर्व वचनांत व कृत्यांत प्रेम आहे;
अपराधी पाप्यांना गरज आहे
येशूमध्ये सदासर्वदा.
   (“इन जीजस” जेम्स प्रॉक्टर यांच्याद्वारा, 1913).

तुम्ही म्हणाल, “मला पटलेले नाही. तुम्ही प्रेमविश्वास यासंबंधी बोलता.” तुम्ही म्हणता, “मी ख्रिस्तावर प्रेम करीत नाही.” “मी त्याच्यावर विश्वास ठेवीत नाही. तुमचा वादविवाद मला पटत नाही.”

मग मला तुम्हांला चेतावणी देऊ द्या. असे दिवस येतील त्यात प्रेमविश्वास यासंबंधीचे गोड शब्द ऐकायला मिळणार नाहीत. तुमचे कान थंड व मृत होतील. तुमच्यासाठी शांति व क्षमेचा शब्द तेथे नसणार. नरकाच्या सार्वकालिक अंधकारात सर्वकांही गढून जाणार.

देव तुमच्याशी क्रोधाने व न्यायासंबंधी बोलण्यापूर्वी. आता माझे ऐका! आणि देव तुम्हांला म्हणतो, “मी तुला बोलाविले व तूं नाकारले.” मला तुम्हांला सांगावयाचे ते हे की, तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवाल काय? ते आता तुम्ही कराल काय? आज रात्री? याहून मी कांही करु शकत नाही. मी तुम्हांला येशूवर विश्वास ठेवण्यास बळजबरी करु शकत नाही. मी ते देवावर सोडून देतो. त्याच्या सामर्थ्याने, देवाने येशूकरिता पुष्कळांची अंत:करणे उघडली. देवाने त्याच्याकडे आकर्षित केलेल्या लोकांमध्ये तुम्ही बसलेले आहांत. येशूकडे आकर्षित करण्यास देव लोकांची निवड करतो. तो जर आकर्षित करीत नाही, तर मी कांही करु शकत नाही. जर देव तुम्हांस तारणांसाठी निवडतो, तर तेथे मी करु कांही करु शकत नाही. जर देवाने तुम्हांस तारणांसाठी निवडले नाही, तर तेथे मी करु कांही करु शकत नाही.

परंतू आजरात्री देव तुमच्या अंत:करणाशी बोलला आहे, तर त्याचा स्विकार करा. आताच त्याचा स्विकार करा. तुम्हांला त्याची खूप गरज आहे, या आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. जोवर देवाचा आत्मा तुमच्या अंत:करणात मी सांगितलेल्या सर्व गोष्टी वापरत नाही तर त्या कांही उपयोगाच्या नाहीत. पेत्र जसा उता-यातील लोकांशी बोलला तसे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो की तुम्ही आता येशूवर विश्वास ठेवावा. जॉन कागॅन, आणि इमी जबालगा आणि तुमच्या अवतीभवतीच्या लोकांबरोबर जे केले ते तुमच्याशी देवाने करावे म्हणून आम्ही प्रार्थना केली. देवाने आज तुम्हांला निवडावे. तुम्ही येशूकडे यावे, येशूवर विश्वास ठेवावा, आणि त्याच्या सर्व−प्रायश्चिताच्या रक्ताने सार्वकालिकतेसाठी तुमचे तारण करावे. आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले: “इन जीजस”
(जेम्स प्रॉक्टर यांच्या द्वारा, 1913).
Solo Sung Before the Sermon by Mr. Benjamin Kincaid Griffith:
“In Jesus” (by James Procter, 1913).


रुपरेषा

पाहणे किंवा विश्वास ठेवणे?

SEEING OR BELIEVING?

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“त्याला पाहिले नसतांहि त्याच्यावर तुम्ही प्रीति करिता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवतां; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण तें उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता” (I पेत्र 1:8, 9).

I.   प्रथम, पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे नव्हे, लुक 18:34; योहान 20:22; 1:11;
यशया 53:3.

II.  दुसरे, पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे! गीतरत्न 2:10; II करिंथ 9:15.