Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




प्रत्येक व्यक्ति सुवार्ता प्रचार करतेय!

EVERY PERSON EVANGELIZING!
(Marathi)

डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्स बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 17 सप्टेंबर, 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, September 17, 2017

“ते जाता जाता शुद्ध झाले” (लुक17:14).


येशू शोमरोन व गालीलातून जात असताना एका छोट्या गावांत आला. त्या गावांबाहेर दहा कुष्टरोगी होते. ते त्याच्यापासून “दूर उभे होते” (17:12). जुन्या करारानुसार कुष्टरोग्यांनी निरोगी लोकांपासून दूर उभारायला लागायचे.

“महारोग्यांनी...अशुद्ध, अशुद्ध, असे ओरडत जावे... त्यांने एकटे राहावे; छावणीच्याबाहेर त्याची वस्ती असावी” (लेवीय 13:45-46).

येशूने अद्भूत चिन्हे केली होती ती त्या दहा कुष्टरोग्यानी ऐकले होते. त्यामुळे, कांही अंतरावरुन, ते आरोळी मारत होते, “अहो येशू, गुरुजी, आम्हांवर दया करा” (लुक17:13). येशूने लगोलग त्यांचा कुष्टरोग बरा केला नाही, परंतू त्याने येरुशलेम येथील मंदीरात जाऊन याजकांस दाखविण्यास त्यांना सांगितले. येशूने हे दोन कारणांसाठी केले: जुन्या करारातील नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी, लेवीय 14:1-20 प्रमाणे, स्वत: याजकाने एखाद्याचा कुष्टरोग बरा झाला किंवा नाही हे बघावे. दुसरे कारण “त्याच्याकडे आरोग्य देण्याचे सामर्थ्य आहे याची याजक व इतर यहुदी लोकांना साक्ष, पुरावा देण्यासाठी” (थॉमस हेल, द अप्लायड न्यू टेस्टामेंट, चारीओट व्हिक्टर पब्लिशिंग1996, पृष्ठ 236).

त्या दहा कुष्टरोग्यांनी येशूचे ऐकले आणि येरुशलेम येथील मंदीरात जाऊ लागले. हे दर्शविते की त्यांचा कांहीतरी विश्वास होता, नाहीतर त्यांनी त्याचे ऐकले नसते. परंतू, आपण पाहतो, की हा तारणासाठीचा विश्वास नव्हता. त्यांनी त्याचे वरवर ऐकले,

“मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले” (लुक 17:14).

कुष्टरोगी गालील प्रदेशातून दक्षिणेकडे प्रवास करीत, खाली येरुशलेम येथील मंदीरात शरीराने गेले.

परंतू त्यातील एक जसा तो बरा झाला आणि येशू जेथे होता तेथे परत माघारी वळला.

“मोठ्याने देवाचा महिमा वर्णीत परत आला, आणि येशूचे आभार मानून त्याच्या [येशूच्या] चरणांवर पालथा पडला...”(लुक 17: 15-16).

“तेव्हां त्याने [येशूने] म्हटले, ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” (लुक 17:19).

आता, मला वाटते येथे ह्या उता-यात पुष्कळ धडे आहेत. मी ते सर्व देणार नाही, परंतू त्यातील तीन हे आहेत ते पाहा.

I. प्रथम, ख्रिस्ताच्या वरवरच्या आज्ञापालनाने अशंत: शुद्धता येते.

हे सर्व दहा पुरुष त्यांच्या कुष्टरोगाच्या बाह्य आजारातून बरे झाले होते. तरीहि येशूच्या केवळ स्पर्शाने लगोलग बरे झाले नाहीत. ते येरुशलेम येथील मंदीरात जाताना वाटेत थोडेसे बरे झाले. परंतू त्यांचा जीवहि अजूहि बरा झाला नव्हता. येशू म्हणाला,

“तुम्ही जाऊन स्वत:स याजकांना दाखवा, मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले” (लुक 17:14).

कित्येक लोक ज्यांचा केवळ वरवरचे आज्ञापालन करतात परंतू संपूर्णत: आज्ञापालन करीत नाहीत ते त्यांच्या पुष्कळ आजारातून बरे होतात. जे मंडळीस येतात, आणि ख्रिस्तीपणाचे मूलभूत नियम वरवर पाळतात, असे आढळून येते की त्यांचे जीवन अधिक नियमीत झालेले आहे, त्यांचा शाळेतील अभ्यासाची सवय चांगला परिणाम निर्माण करते. त्यांचे त्यांच्या भावनांवर नियंत्रण असते. सर्वसाधारणत:, जे ह्या आधुनिक समाजात “तळ्यात मळ्यात” असे गोंधळलेले असतात त्यांच्यापेक्षा ते त्यांच्या जीवनांत अधिक यशश्वी आणि फलदायी झालेले असतात. (इफिस4:14).

“जगातील” लोक सहसा असा विचार करतात की मंडळीत येणे हे त्यांच्या जीवास धोका आहे, त्यांच्या कामाचा किंवा शाळेचा पुष्कळसा वेळ घेतल्याने. अख्रिस्ती आईवडील सहसा असा विचार करतात. त्यांना वाटते की मंडळीत येण्याने त्यांच्या मुलांचा पुष्कळसा वेळ वाया जातो, त्यामुळे ते शाळेत किंवा कामात चांगले कांही करत नाहीत. परंतू आपणांस पुन्हां पुन्हां कळते की सत्य हे ह्याच्या अगदी विरुद्ध आहे. जेव्हां तरुण मुले मंडळीच्या सांगितलेल्या सेवेस हजर राहतात, आपणांस आढळते, अपेक्षा शिवाय, खरेतर ते खूप चांगले विद्यार्थी आणि खूप चांगले कामगार आहेत. ते त्यांचा अभ्यास नियमीत करण्यास शिकतात, “वेळेचा सदुपयोग करणे” (इफिस 5:16; कलस्सै 4:5). मंडळी पुढा-यांच्या आग्रहास्तव, आणि सभासदांच्या उदाहरणावरुन, ते कामाच्या व शाळेच्या ठिकाणी परिश्रमाचे महत्व समजतील. जगातील मुले घालतात तशी, “भुरळ घालण्याऐवजी”, त्यांच्या उपलब्ध वेळेत ते खूप काम व अभ्यास करतात.

आमच्या मंडळीत अमेरिकेतील महाविध्यालयीन विध्यार्थी व महाविध्यालयीन पदवीधारक यांची सर्वात जास्त टक्केवारी आहे असा माझा विश्वास आहे. आणि मला वाटते आपल्या बाह्य समस्येमुळे जे आपल्या स्थानिक मंडळीच्या सहभागितेत, आणि नियोजीत सभांना येत नाहीत अशांमधून जे येशूच्या आज्ञा पाळतात त्यांना तो “शुद्ध करितो” याचा हा पुरावा आहे. कित्येक वर्षाच्या परिक्षणानंतर पुन्हां पुन्हां हे सत्य सिद्ध झाले आहे.

II. दुसरे, तुम्ही ख्रिस्ताकडे येता तेव्हां परिपूर्ण तारणाचा अनुभव घेता.

दैहिक हे दहा पुरुष बरे झाले, शाररिकरित्या ते कुष्टरोगातून बरे झाले, तेव्हां त्यातील नऊ संतुष्ट झाले. परंतू त्यातील एक केवळ शाररिक आज्ञापालनाने संतुष्ट झाला नाही. देवाला धन्यवाद देण्यासाठी त्याच्या ह्दयात उकळी फुटली. तो परत फिरला व येशू जेथे होता तेथे गेला. “येशूचे आभार मानून” तो त्याच्या चरणावर पालथा पडला (लुक 17:16). दुस-या शब्दात सांगावयाचे तर, हा मनुष्य ख्रिस्ताकडे आला! तो येशूकडे आला आणि, त्याच्या पाया पडून केवळ शाररिक आरोग्य मिळाले नाही, तर त्याला परिपूर्ण तारण मिळाले.

तुम्ही आमच्या मंडळीत येता आहांत, नियमीत सभांना येता आहांत, तर ते चांगले आहे. ते तुमच्या जीवनांत व कामात उपयोगी पडेल. परंतू केवळ चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यास मदतीपेक्षा अधिक खरे ख्रिस्तीपण आहे! खूप यशश्वी जीवन जगणा-या एका मनुष्यांस येशू म्हणाला,

“तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हांला सागिंतले म्हणून आश्चर्य मानू [विस्मित होऊ] नका” (योहान 3:7).

जो कुष्टरोगी येशूकडे त्याच्याबाबतीत हे घडले. येशूच्या आज्ञा पाळल्याने तो शाररिकरित्या शुद्ध झाला, तो येशूकडे आला, त्याच्या पायावर चरणावर पालथा पडला, आणि आंतरिक परिवर्तित झाला. आणि ख्रिस्त त्याला म्हणाला,

“तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” (लुक 17:19).

मी द अप्लायड न्यू टेस्टामेंट बरोबर सहमत आहे. मला वाटते की त्याने विश्वसनीय किंग्ज जेम्स पवित्रशास्त्रातून सांगितले आहे, तरीहि कुष्टरोगातून बरा झाला जो येशूकडे आला त्याच्याविषयी काय घडले हे चांगले स्पष्ट करते. जेव्हां येशू त्याला म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” हे समालोचन जाहिर करते की “केवळ त्याचे शरीर शुद्ध झाले नाही, तर त्याचा आत्माहि शुद्ध झाला असे येशूला म्हणावयाचे आहे. त्याला तारण मिळाले” (ibid., पृष्ठ 314).

तुमच्यापैकी कांहीजण मंडळीत येता. हे करण्याकरिता तुम्हांस आशिर्वादीत आणि साहय्यभूत केले आहे. त्याकरिता देवाचे आभार मानतो. परंतू आता तुम्हांला एक पाऊल पुढे जाण्यास व परिपूर्ण तारण मिळविण्यास सांगतो, विश्वासाने येशूकडे येऊन, आणि त्याच्या पाया पडून, त्याच्यावर संपूर्ण भरवंसा ठेऊन, परिपूर्ण तारण मिळविणे.

शेवटी, ह्या जगात केवळ एक चांगले जीवन देण्यासाठी ख्रिस्ताने वधस्तंभावर दु:ख व मरण सहन केले नाही. त्याहून! तो वधस्तंभावर मरण पावला यासाठी की, तुमच्या पापाची क्षमा व्हावी, आणि त्याच्या मोलवान रक्ताने शुद्ध व्हावे. तुम्हांस सार्वकालिक जीवन देण्यासाठी, तो मृतांतून उठला, आणि आता देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. ह्या माणसाने विश्वास ठेवला तसा, तुम्ही सुद्धा साधा विश्वास ठेऊन, तुम्ही सुद्धा सर्वकाळ व अंतकाळ परिवर्तित, नव्याने जन्मलेले, असे होऊ शकता. वास्तवातील परिवर्तन तुम्हांला मिळो! परंतू माझा विश्वास आहे ह्या उता-यात तिसरा धडा एक आहे, प्रत्येक व्यक्ति सुवार्ता प्रचार करतेय या वरील धडा.

III. तिसरे, तुमचे परिवर्तन झाल्यानंतर लगेचच तुम्ही सुवार्ता प्रचार करण्यास सुरु केले पाहिजे.

ह्या दहा अशुद्ध (अपरिवर्तित) माणसांना येशूने काय म्हटले लक्षात घ्या

“तुम्ही जाऊन स्वत:स याजकांना दाखवा, मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले” (लुक 17:14).

येशूने त्यांना पाठविले “याजक व इतर यहुदी लोकांसाठी, एक साक्ष, एक पुरावा म्हणून,” येशूविषयी त्यांना सांगण्यास (द अप्लायड न्यू टेस्टामेंट, ibid., पृष्ठ 236). ते शुद्ध होण्यापूर्वी आणि त्यांच्यापैकी कोणाचेहि परिवर्तन होण्यापूर्वी त्यांना साक्ष म्हणून पाठविण्यात आले!

आता, हे उल्लेखनीय नव्हे काय! आजरोजी, बरेच सुवार्तिकांना वाटते तुम्ही बाहेर जाण्यास व सुवार्ता सांगण्यास जाण्यापूर्वी, तुम्ही एक खंबीर ख्रिस्ती, विश्वासात बळकट, भरपूर पवित्रशास्त्राचे ज्ञान असलेले असले पाहिजे. मी म्हणतो हा मुर्खपणा आहे! हे एखाद्याला मंडळीच्या एखाद्या सभेला येण्यापूर्वी तू खंबीर ख्रिस्ती असला पाहिजे असे सांगण्याइतपत मुर्खपणा आहे! तरीहि मला ठाऊक आहे अशाप्रकारचे सुद्धा मुर्ख लोक आहेत जे असा, विचार करतात! परंतू अशाप्रकारचे पवित्रशास्त्र कांही शिकवीत नाही. येशूने अगदी सुवार्ता सांगण्याठी आपल्या बारा शिष्यांना बाहेर पाठविले. अश्शर्सच्या घटनाक्रमानुसार, शिष्यांना सुवार्तेसाठी ज्या वर्षी शिष्यांना येशूने पाचारण केले त्याच वर्षी त्यांना बाहेर पाठविले. ते केवळ त्या वर्षी छोट्या काळासाठी त्याचे शिष्य होते जेव्हां तो

“त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला...ते तेथून निघाले, व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली” (मार्क 6:7, 12).

त्यातील किमान एकाचे (यहुदा) परिवर्तन सुद्धा झाले नव्हते. तरीहि त्यांना लगोलग सुवार्तेची घोषणा करण्यास पाठविले, परिवर्तन झाले किंवा नाही, विश्वासात खंबीर आहे किंवा नाही! सुवार्तेची घोषणा करण्यास ते बाहेर गेले – ख्रिस्ताच्या आज्ञेवरुन!

ख्रिस्ताच्या ह्या महान पद्धतीवरुन आपण कांहीतरी शिकू शकतो असे मला वाटते, त्याची एक सर्वात सुपरिचित आज्ञा:

“तेव्हां तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा” (मत्तय 28:19).

त्याची आज्ञपालन करण्यापूर्वी आम्ही प्रशिक्षण घेतले पाहिजे का? त्या दहा कुष्टरोग्यांनी याजकांना व इतर यहुद्यांना घोषणा करण्यापूर्वी प्रशिक्षण घेतले नव्हते. का, माणसें, त्यांचे तारण झाले नव्हते तरी! तरीहि ख्रिस्ताने त्यांना याजकांस व इतर यहुद्यांस घोषणा करण्यास लगोलग सांगितले. शिष्य सुद्धा अगदी अडाणी होते, केवळ दुर्लक्षित कोळी होते, परंतू येशूने त्यांना लगोलग, दोघेदोघे, सुवार्तेची घोषणा करण्यास पाठविले.

मला वाटते आजहि आपण असेच करायला हवे. येशूने जी पद्धत राबविली ती राबविली पाहिजे. लोकांना पवित्रशास्त्राचे प्रशिक्षण दिले पाहिजे. होय! त्याचे पूर्ण प्रशिक्षण घेण्यापूर्वी त्यांनी सुवार्तेची घोषणा करण्यास जायला हवे. त्यांनी शास्त्रलेखाचा सिद्धांत ऐकण्यापूर्वी त्यांनी सुवार्तेची घोषणा करण्यास जायला हवे!

तुम्ही लोकांना अविरत प्रशिक्षण देऊ शकता आणि तरीहि मंडळीत सुवार्ता ऐकण्यास एखादाहि हरविलेला आत्मा आणलेला दिसत नाही. तुम्ही लोकांना शास्त्राचा मोठा उलगडा करुन द्याल, त्यांना वचनांमागून वचन स्पष्ट कराल, तरीहि मंडळीत सुवार्ता प्रचार ऐकण्यास एखादाहि हरविलेला आत्मा आणलेला दिसत नाही.

कोणत्या तरी विचारवंत जाणतो का ते खरे आहे, आणि तरीहि त्यांना त्यासंबंधाने काय करायचे ते ठाऊक नाही. परंतू येशूने आपणांस सांगितले – ते प्रशिक्षीत असो वा नसो, परिवर्तन झालेले असो वा नसो, त्यांना सुवार्तेची घोषणा करण्यास पाठवा! मंडळीतील प्रत्येकांने सुवार्तेस गेले पाहिजे. हा एक ख्रिस्ताचे आज्ञापालन करण्याचा साधारण भाग आहे, आणि जे आमच्या मंडळीत एकापेक्षा जास्त वेळ दारातून येतात त्या प्रत्येकांस आहे असे मला वाटते.

त्यांना अधिक कशाची गरज नाही. “मंडळीत कांहीतरी अद्भूत घडत आहे, आणि तेथे तुमची गरज आहे” असे कांही साधे सर्वांनी म्हणणे गरजेचे आहे. आणि त्यांचे फोन क्रं. घेऊन या आणि मंडळीतील पुढा-यांनी पाठपुरावा केला पाहिजे. ही योजना घेऊन अनेक भेट देणारे आहेत. मी प्रत्येक रविवारी सुवार्ता प्रचार करतो. सुवार्तिक प्रचार हा रविवारच्या प्रत्येक उपासनेत पुष्कळ तारण न झालेल्यांस गरजेचे आहे.

ज्या पद्धतीने येशूने लोकांना जगांत पाठविले त्या साध्या गोष्टी मी सांगतो. शेवटी, बाकी सर्व कोणतेहि मार्ग चांगले काम करीत नाही, नाही ना? परंतू मला ठाऊक आहे येशूची पद्धत जे वापरतात ती काणतीहि मंडळी भरेल, प्रत्येक उपासनेत जगातील डझनभर येतील. डॉ. जॉन आर. राईस वारंवार म्हणाले, “केवळ संपूर्णत: नवीन कराराच्या आत्मा जिकंण्यास मॅच करु शकतो” (जॉन आर. राईस, डी. डी., आपल्या मंडळीतील लोक आत्में का जिंकत नाहीत, स्वर्ड ऑफ द लॉर्ड पब्लीशर, 1966, पृष्ठ 149). त्यावर मी त्याच्यासह सहमत आहे!

आणि आणखी एक गोष्ट, लोकांना सुवार्तेस बाहेर पाठविले की ते ख्रिस्तामध्ये वाढतात. लोक सुवार्तेची घोषणा करणार नाहीत तर ते थंडावतात. परंतू मला अनुभवातून माहित आहे की ते दर आठवडी सुवार्तेची घोषणा करतात तर ते लवकर खंबीर ख्रिस्ती बनतात. ख्रिस्ती लोकांच्या वाढीचे गमक महान आज्ञेच्या पालनामध्ये आहे!

“मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले” (लुक 17:14).

सगळीकडील लोकांना जर तुम्ही सुवार्तेची घोषणा कराल तुमचे जीवन बदलेल! आणि मग, अर्थात, तुम्ही नव्याने जन्मले आहांत! विश्वासाने तुम्ही ख्रिस्ताकडे येत असतां, देव सर्वांना नवीन जन्म देवो. मग त्यानंतर ह्याहून अधिक हरविलेल्यांना सुवार्ता सांगण्यास यशश्वी होवो. तुम्हांला स्वत:ला सुवार्ता कार्यात झोकून देण्यास देव प्रेरणा देवो, आणि हे शक्य तितक्या लवकर करो. आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन यांनी केले: डॉ. क्रिघटन एल. चॅन: लुक 17:11-19.
उपेशापूर्वी एकेरी गीत गायले: मि.बेंजामिन किनकैड ग्रीफ्थ: “सो लिटल टाईम”
( डॉ. जॉन आर. राईस यांच्याद्वारा 1895-1980).


रुपरेषा

प्रत्येक व्यक्ति सुवार्ता प्रचार करतेय!

EVERY PERSON EVANGELIZING!

डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“ते जाता जाता शुद्ध झाले” (लुक17:14).

(लुक 17:12; लेवीय 13:45-46; लुक 17:13, 14, 15-16, 19)

I.   प्रथम, ख्रिस्ताच्या वरवरच्या आज्ञा पालनाने अंशत: शुद्धी येते,
लुक 17:14; इफिस 4:14; 5:16; कलस्सै 4:5.

II.  दुसरे, तुम्ही ख्रिस्ताकडे येता तेव्हां परिपूर्ण तारणाचा अनुभव घेता,
लुक 17:16; योहान 3:7; लुक 17:19.

III. तिसरे, परिवर्तन होण्यापूर्वी, लगोलग सुवार्ता प्रचार करण्यास सुरु केले पाहिजे,
लुक 17:14; मार्क 6:7, 12; मत्तय 28:19.