Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




परमेश्वराच्या सेवकाचे दु:ख सहन आणि विजय !

(यशया 53 वर आधारित उपदेश क्र.1)
THE SUFFERING AND TRIUMPH OF GOD’S SERVANT!
(SERMON NUMBER 1 ON ISAIAH 53)
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि.यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बाप्टीस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी दि.24 फेब्रु. 2013 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, February 24, 2013

“पाहा माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होर्इल, तो अत्युच्च होर्इल, ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्यासारखे नव्हते इतका तो विरूप होता.) त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांस दचकावयास लावील, राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करितील कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.” (यशया 52:13-15).


कृपया हा उतारा आपल्या पवित्रशास्त्रातून उघडा. जॉन गील तथा ‘बहुतांशी’ आधुनिक समालोचकांच्या मतानुसार, खरेतर ही वचनें 52 व्या अध्याया ऐवजी 53 व्या अध्यायामध्ये असायला हवीत. (फ्रँक इ.गिबलीन, डी.डी. एक्सपोझिटर्स बायबल कॉमेंट्री, रिजेंसी रेफरन्स लायब्ररी, 1986, आवॄत्ती 6 पृष्ठ क्रं.300).

मॉथ्यू हेन्री म्हणाले, वचन 13 पासून ते 53 अध्यायातील 12 व्या वचनांपर्यंत संपूर्ण उतारा हा परमेश्वराच्या “दु:खसहन करणा-या सेवकाच्या” संदर्भात आहे

ही भविष्यवाणी, इथे सुरू होते व पुढच्या अध्यायाच्या शेवटापर्यंत चालू राहते, ती थेट येशू ख्रिस्ताला दर्शविते प्राचिन यहुद्यांना समजले होते की; हे मसिहाच्या बाबतीत आहे, आधुनिक (गुरूजी) भयंकर दु:खसहन असा विपर्यास अर्थ घेत असले तरी… फिलीप्प मात्र षंढास (ह्या उता-यातून) सांगताना हे येशूसंबंधी आहे असे सांगतो, “संदेष्टा त्याच्या विषयी सांगत आहे” त्याच्याविषयी म्हणजे दुस-या कोणाविषयी नाही, असे तो भूतकाळ वादामध्ये टाकतो. प्रे. कृ. 8: 34,35 (संपूर्ण पवित्रशास्त्रावरील मॉथ्यू हेन्रीचे समालोचन, हेंड्रीकसन प्रकाशक, 1996 पुर्नमुद्रण, आवॄत्ती 4,पृष्ठ 235).

अबेन एज्रा आणि अलशेख ह्या प्राचीनकाळच्या गुरूजीनी केले त्याप्रमाणे प्राचीन यहुदी तारगम म्हणते की, हे मसीहाला दर्शविते, (जॉन गील, डी. डी., ऍन एक्सपोझिशन आॉफ द ओल्ड टेस्टामेंट, बाप्टिस्ट स्टँडर्ड बिअरर, 1989 पुर्नमुद्रण, आवॄत्ती 1, पृष्ठ 309).

स्पर्जन म्हणाले, तसेच संपूर्ण इतिहासामध्ये ख्रिस्ती समालोचक हा उतारा प्रभू येशू ख्रिस्तासंबधीची भविष्यवाणी आहे, अशा दॄष्टीने पाहतात.

नाही तर त्यांनी काय केले असते? संदेष्ट्याने दुस-या कोणाचा संदर्भ दिला असता? नाजरेथकर मनुष्य, देवाचा पुत्र, ह्या तीन वचनांमध्ये योग्य बसला नसता, तर ते मध्यरात्रीच्या निबीड अंधकाराध्ये असते. प्रत्येक शब्द हा आपल्या प्रभू येशूकरिता चपलख लागू करण्यास आपणास जराहि संकोच वाटत नाही.(सी.एच. स्पर्जन,“वधस्तंभावर खिळलेल्याचा खात्रीशीर विजय,” द मेट्रोपोलिटन टॉबरनिकल पुलपीट, पील्ग्रीम पब्लिकेशन, 1971 पुर्नमुद्रण, आवॄत्ती XXI, पृष्ठ 241).

अ मॉथ्यू हेन्रीने हे अगोदरच सांगितले आहे, सुवार्तिक फिलिप्प हे म्हणतात की, पवित्रशास्त्रातील हा उतारा पुढे होणा-या ख्रिस्ताच्या दुख:सहना विषयी सांगतो.

“तेव्हां षंढाने फिलिप्पाला म्हटले, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वत:विषयी किंवा दुस-या कोणाविषयी? तेव्हां फिलिप्पाने बोलावयास आरंभ केला व ह्म शास्त्रलेखापासून सुरूवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.” (प्र. कृ. 8: 34-35).

पुरातन काळातील गुरूजी, प्राचिन तारगम, ह्या युगातील सुवार्तिक फिलिप्प, आणि ख्रिस्ती समालोचक ह्यांच्यापेक्षा अधिक चांगले करू शकत नाही. आपल्या ह्या उता-यातील प्रत्येक शब्द हा मसीहा, प्रभू येशू ख्रिस्त याची भविष्यवाणी आहे.

I. प्रथम, आपण येशूने परमेश्वरासाठी केलेली सेवा पाहतो.

13 वे वचन हे देव जो बाप याने स्वत: म्हटले आहे,

“पाहा माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होर्इल, तो अत्युच्च होर्इल.” (यशया 52:13).

आपणांस परमेश्वर त्याच्या “सेवकाकडे” पाहण्यास सांगत आहे. येशू या पृथ्वीतलावर आला, तेव्हां तो

“तर त्याने स्वत:ला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.” (फिलिप्पै. 2:7).

परमेश्वराचा सेवक म्हणून, येशू सुज्ञतेने वर्तला, आणि हुशारीने कार्य केले. येशूने जगात सेवा करताना जे तो बोलला आणि कृति केली ते सर्व सुज्ञतेने. मंदिरात एक लहान बालक म्हणून असताना, त्या काळचे गुरूजी त्याची बुद्धीमत्ता पाहून थक्क झाले. त्यानंतर परूशी व सदुकी त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकली नाहीत, तो जेव्हां बोलला तेव्हां रोमी राज्यपाल, पिलाताची बोलती बंद झाली.

म्हणून शास्त्रलेख परमेश्वराच्या सेवक संबंधी म्हणतो,

“तो थोर व उन्नत होर्इल, तो अत्युच्च होर्इल.” (यशया 52:13).

आधुनिक इंग्रजीमध्ये “उंच केले जाणे,” “उचालणे,” आणि “अत्युच्च करणे,” या अर्थाचे शब्द दिले आहेत. डॉ. एडवर्ड जे. यंग निर्देशित करतात की, “फिलिप्पै 2: 9-11 व प्रे.कृ. 2: 33 मध्ये ख्रिस्तास ज्या शब्दात उंचाविले आहे त्याची आठवण केल्याशिवाय हे शब्द वाचणे अशक्य आहे.” (एडवर्ड जे. यंग, पीएच.डी., यशयाचे पुस्तक, एर्डमन्स, 1972, आवॄत्ती 3, पृष्ठ 336).

“ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नांव ते त्याला दिले.” (फिलिप्पै 2:9).

“त्या येशूला देवाने उठविले… ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहों, म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.” (प्रे. कृ.2:32-33).

“पाहा माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर उन्नत होर्इल, तो अत्युच्च होर्इल.” (यशया 52:13).

Exalted – “उंच करणे” Extolled – “उन्नत” Very High - “अत्युच्च” हे ते शब्द आहेत ख्रिस्तास उंच केल्याच्या पाय-या परावर्तित होतात. तो मरणातून उठला! त्याला स्वर्गारोहनाच्या वेळी स्वर्गात उचलण्यात आले ! आता देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे ! Exalted – “उंच करणे” Extolled – “उन्नत” Very High - “अत्युच्च” - स्वर्गामध्ये देवाच्या उजव्या हाताकडे! आमेन!

तो मरण्यास उंच केला होता,
   “पूर्ण झाले आहे,” अशी त्याची आरोळी होती;
आता स्वर्गात अत्युच्च केले;
   हालेलुया ! काय तो तारक!
(फिलिप्प पी. ब्लीस यांचे “हालेलुया ! काय तो तारक!” 1838-1876).
(“Hallelujah, What a Saviour!” by Philip P. Bliss, 1838-1876).

“पाहा माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होर्इल, तो अत्युच्च होर्इल.” (यशया 52:13).

येशू हा, मरणातून उठलेला, स्वर्गात गेलेला, आणि देव-पित्याच्या उजवीकडे बसलेला, देव जो बाप - देव जो पुत्र याचा सेवक आहे, आणि सदैव राहणार आहे! हालेलुया ! काय तो तारणारा!

II. दुसरे, येशू ख्रिस्ताने पापाकरिता केलेले अर्पण पाहतो.

कृपया वचन 14 वे मोठ्याने वाचा.

“ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्यासारखे नव्हते इतका तो विरूप होता.”) (यशया 52:14).

डॉ. यंग म्हणाले ज्यानी “सेवकाचा [असलेला] भयंकर कुरूप चेहरा पाहिला आणि त्याला धाक बसला…. त्याचे कुरूपपण इतके भयंकर होते की, तो मनुष्यजातीसारखा [असलेला] दिसत नव्हता….त्याचे दु:ख किती महाभयंकर होते हे तीव्रतेने सांगण्याची पद्धत आहे.” (ibid पृष्ठ 337-338).

येशू त्याच्या दु:खसहनाच्या समयी भयंकर कुरूप दिसत होता. वधस्तंभावर देण्याच्या आदल्या रात्री त्यास भयंकर “क्लेश” होता,

“तेव्हां रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.” (लुक 22:44).

आणि हे त्याला अटक करण्यापूर्वी झाले होते. गेथशेमाने बागेच्या अंधारात, तुमच्या पापाकरिताचा दंड भरण्यास सुरूवात झाली. सैनिक त्याला अटक करण्यासाठी आले, त्याअगोदरच तो रक्तासारख्या घामामुळे चिंब भिजून गेला होता.

नंतर ते त्याला घेऊन गेले व त्याच्या चेह-यावर चपडाका मारल्या. दुस-या एका ठिकाणी, यशया संदेष्टा त्याच्या भयंकर दु:खसहनाविषयी म्हणतो,

“मी मारणा-यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड लपविले नाही.” (यशया 50:6).

लुक म्हणाला, “त्यांनी त्याच्या चेह-यावर चपडाका मारल्या.” (लुक 22:64). मार्क म्हणाला, पिलाताने त्याला “फटके मारण्याची आज्ञा दिली.” (मार्क 15:15). योहान म्हणाला,

“नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले, शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरविले; आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो ! मग त्यांनी त्याला चपडाका मारल्या.” (योहान 19:1-3).

नंतर त्यांनी त्याचे हात व पाय वधस्तंभावर खिळले. डॉ. यंग असे लिहतात की, “त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्यासारखे नव्हते इतका तो विरूप झाला होता.” ( ibid., पृष्ठ 338).

“ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्यासारखे नव्हते इतका तो विरूप होता.”) (यशया 52:14).

मेल गिब्सनचे “ख्रिस्ताचे दु:खसहन” चित्र ज्यामध्ये ख्रिस्ताला फटके मारलेले, वधस्तंभावर खिळलेले असे चित्रित केले आहे, ह्या चित्रासारखे दुसरे कुठलेहि आधुनिक चित्र एवढे परिपूर्ण नाही.

स्कोफिल्ड अभ्यासाचे पवित्रशास्त्र ह्या वचनां विषयी म्हणते, “रेखाटलेले चित्रण अगदी भयंकर आहे: “तो मनुष्यजातीहून खूपच कुरूप होता, त्याचे रूप मनुष्याच्या पुत्रासारखे नव्हते’ - म्हणजेच मनुष्यजात नव्हे - कौर्याची परिसीमा मत्तय 26…” मध्ये वर्णलेली आहे. योसेफ हार्ट यांची कविता ऐका (1712-1768),

ता काट्यानी त्याचे मंदिर रक्तरंजीत व जखमा केले,
   रक्ताच्या धारा प्रत्येक अंगातून घालवा;
त्याच्या पाठीवर मोठाले आसूड ओढले,
   कुचीदार आसूडाने त्याचे ह्र्दय फाटले.

शापीत झाडावर उघडा असा खिळला,
   धरती व आकाशाच्या वर उघडा झाला,
जखम व रक्तधारा यांचे प्रदर्शन,
   जखमा प्रीतीचे दु:खीत देखावा!
(योसेफ हार्ट यांचे “त्याचे दु:खसहन”, 1712-1768; “ही मध्यरात्र व जैतूनाच्या कपाळावर” याच्याशी मिळते जुळते).
(“His Passion” by Joseph Hart, 1712-1768;
      to the tune of “‘Tis Midnight, and on Olive’s Brow”).

आणि का, प्रिय तारका, मला सांग का
   रक्तरंजीत मरण खोटे नाही ना?
तुझा उद्देश हा किती सामथ्र्यी असेल?
   त्याचा उद्देश सरळचा आहे!
(योसेफ हार्ट यांचे “गेथशेमाने, जैतूनाचे महत्व! 1712-1768; चाल ही मध्यरात्र व जैतूनाच्या कपाळावर”).
(“Gethsemane, the Olive-Press!” by Joseph Hart, 1712-1768;
   to the tune of “‘Tis Midnight, and on Olive’s Brow”).

माझ्या प्रिय तारका मला सांग की, माणसापेक्षा तुझे दिसणे भयंकर का आहे? याचे उत्तर 12 व्या वचनाच्या शेवटी, 53 व्या वचनात दिले आहे, “त्याने बहुतांचे पाप आपणावर घेतले.” (यशया 53: 12). हे तुमच्या पापाकरिता ख्रिस्ताचे अर्पण आहे, आमच्या बदल्यात केलेले अर्पण - वधस्तंभावर - येशू ख्रिस्त आमच्या जागी दु:खसहन व मरण पत्करीत आहे! अशाप्रकारे आपण ख्रिस्ताची देवाप्रति असलेली सेवा पाहतो. तसेच आमच्या पापाबद्दलंचा दंड म्हणून ख्रिस्ताने केलेले अर्पण देखील पाहतो.

III. तिसरे, ख्रिस्ताने देऊ केलेले तारण आपण पाहातो.

कृपया उभे राहून यशया 52: 15 मोठ्याने वाचा

“त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांस दचकावयास लावील, राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करितील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.” (यशया 52:15).

तुम्हीं बसू शकता. डॉ. यंग येथे म्हणतात की, या वचनामध्ये ख्रिस्ताचे अर्पण व दु:खसहन याचा सविस्तर उलगडा आणि लागूकरण वचन 14 मध्ये केले आहे,

“तो [ख्रिस्त] का कुरूप झाला. हे संदेष्टा स्पष्ट करितो… आणि अशा या कुरूप अवस्थेमध्ये तो “अनेक राष्ट्रांस दचकावयास लावील काय,” जो स्वत: कुरूप झाला आहे तो इतरांसाठी कांहीतरी करील काय, अशा अवस्थेमध्ये शुद्धता करील काय. त्याचा कुरूपपणा (त्याच्या दु:खसहनामध्ये)… असताना तो राष्ट्रांस शुद्ध करील. “तो सिंचन करील” हे क्रियापद शुद्ध करण्यासाठी पाणी अथवा रक्त सिंचन करणे [याबाबत बोलते]. हे [याजक म्हणून ख्रिस्ताचे] काम आहे ते येथे दर्शविले आहे, आणि ह्या कामाचा उद्देश म्हणजे दुस-यांस शुद्ध व पवित्र करणे… राष्ट्रांस शुद्ध करण्यासाठी तो स्वत:च याजक म्हणून पाणी आणि रक्त याचे सिंचन करील. शुद्धतेसाठी आणि जो त्याला धरून राहील त्याच्यामध्ये खोलवर परिणाम होऊन बदल घडेल यासाठी त्याने हे दु:खसहन केले. (Ibid., पृष्ठ 338-339).

ह्या भविष्यवाणीची खरीखुरी परिपूर्तता, ख्रिस्ताचे शुभवर्तमान यहुद्यांच्या बंधनातून सोडवणे आणि त्यांस वैश्विक धर्म बनविणे. अगदी पहिल्या शतकांपासून “पुष्कळ राष्ट्रांस” शुभवर्तमान कळविले आहे, आणि येशूच्या रक्ताने संपूर्ण जगातील लोक शुद्ध झालेले आहेत, तसेच त्यांस ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त होत आहे. जसे की डॉ. यंग म्हणतात, “जो त्याला धरून राहील त्याच्यामध्ये खोलवर परिणाम होऊन बदल घडेल.” जगातील सगळ्या राष्ट्रांतील माणसांचे तारण झाले नसले तरी, ख्रिस्तीत्व मात्र सगळीकडे पसरले आहे, “त्यामुळे राजांची तोंडे बंद राहतील,” आणि ते साधू ख्रिस्ती बनतील, तसेच त्याच्या विरूद्ध बोलणारे नाहीत. आजच्या घडीलाहि, राणी एलिझाबेथ II हिने “त्याच्याकडे पाहून” तोंड बंद केले आहे आणि वेस्टमिनिस्टर ऍब्बे येथे घेतल्या गेलेल्या ख्रिस्ती सभेला त्याच्या सन्मानार्थ त्या नतमस्तक झाल्या. पश्चिम व पूर्व जगतातील अनेक राजे किमान बाहेरून तरी आदर देतात, आणि त्यांच्यातील पुष्कळ जसे की, राणी व्हिक्टोरिया, हिने बाहेरील आदरापेक्षा जास्त आदर देतात. खरोखर, असेच कॉन्स्टॉनटार्इन राजाने ख्रिस्तीपणाच्या आरभीच्या वर्षामध्ये केले होते, आणि इतरांनाहि असेच केले होते.

“कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.” (यशया 52:15).

सर्व राष्ट्रांस येशूचे शुभवर्तमान कळविले जार्इल हे संदेष्ट्याने पूर्वीच सांगून ठेवले होते,

“तो अनेक राष्ट्रांस दचकावयास लावील.”(यशया 52:15).

नुसते नामधारी ख्रिस्ती असले तरी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा विशेष प्रसंगी आपले मस्तक लववतात आणि “[आपले] मुखहि बंद ठेवतात.”

परंतू आपणास मला सांगू द्या की, ह्या अद्भूत भविष्यवाणीची युरोप, युनायटेड किंगडम, आणि अमेरिका येथे एखाद्या वेळेस सोडून, जास्त करून उहापोह झालाच नाही. पवित्रशास्त्रावर “मुक्तपणा” चे अतिक्रमण आणि शुभवर्तमानाचा विपर्यास झाल्याने मंडळ्या कमकुवत बनल्यामुळे पश्चिमेकडील मंडळ्या गोंधळलेल्या आणि द्विधा अवस्थेत आहेत. आणि आधुनिक सगळ्या प्रकारात “स्वतंत्र निर्णय” पद्धतीमुळे त्याचे अनुयायी चुकीच्या मार्गाने जात आहेत. तरीहि ह्या अवघड तिस-या जगात, सामथ्र्याने जागॄती व संजीवन येत आहे, प्रेषितांच्या काळातील, कमकुवत मंडळ्या अजूनहि उजळत आहेत. जगाचा इतर भाग म्हणजे चीन, दक्षिणपूर्व आशिया, भारत ह्या भागात मोठ्या संख्येने लोक ख्रिस्ताकडे येताना पाहून आमचे मन अगदी आनंदी झाले. ह्या घडीला शुभवर्तमानाचा पूर मंडळ्यामधून कोण आणील! होय, ब-याचदा छळ होतो, परंतू दुस-या शतकात, टरटुलियनने म्हटले तसे, “रक्तसाक्षी होणा-याचे रक्त हे मंडळीसाठी बीज आहे.” आणि आज हे तिस-या जगात सुद्धा खरे आहे. अमेरिका आणि पश्चिम राष्ट्रें त्यांच्या ख्रिस्ती विश्वासापासून दूर जात असताना आणि मानवतावाद, संशयास्पद आध्यात्मिक गोंधळ निर्माण झाला आहे. तरीहि स्पर्जन सांगतात,

येशू केवळ…यहुद्यांनाच सिंचन करणार असे नाही, तर सगळीकडील परराष्ट्रीयांना सुद्धा करणार आहे. सर्व भूमि त्याचे ऐकेल, आणि कापलेल्या गवतावर दव पडल्याप्रमाणे होर्इल. दूरवरच्या काळसर जाती, आणि सूर्यास्ताकडील भूमीमध्ये राहणारे तुझा सिंद्धात ऐकतील आणि तुझ्यातून ते पितील… तूं तुझ्या कृपायुक्त शब्दाने अनेक राष्ट्रांस सिंचन करशील. (Ibid पृष्ठ 248).

स्पर्जनचा “भविष्यात्मक” संदेश जरी शंभर वर्षापूर्वी दिलेला असला तरी आजहि अधिक खरा वाटतो आहे. आणि त्याचा आम्हांला आनंद आहे! आमेन!

ह्या अभिवचनाची अजून पूर्णत: परिपूर्तता झाली नाही. परंतू ते परमेश्वराच्या मुखातून बोलले गेले असावे-यशया संदेष्ट्याद्वारे, जो म्हणाला,

“राष्ट्रें तुझ्या प्रकाशाकडे येतील” (यशया 60:3).

“परराष्ट्रीयांच्या झुंडी तुझ्याकडे येतील” (यशया 60:5).

“हे पाहा, हे लांबून येत आहेत, हे पाहा हे पूर्वेकडून व पश्चिमेकडून येत आहेत, हे सीनी लोकांच्या देशांतून येत आहेत.” (यशया 49:12).

जेम्स हडसन टेलर, चीनमधील आरंभीचे सुवार्तिक म्हणतात की, “सीनी” ही चीनची भूमि होती, जसे की स्कोफिल्ड अभ्यासाचे पवित्रशास्त्र, यशया 49:12 वरील टिप्पणीमध्ये करते. आज आपल्या डोळ्यासमोर घडत असताना पाहून टेलर व स्कोफिल्डच्या टिप्पणीशी असहमत कसे होऊ शकतो? थोडे असले तरी, निश्चितच हे खरे आहे! चीन संघराज्यामध्ये तासाला हजारो लोक ख्रिस्ताकडे येत आहेत, दूर दूरची भूमि आणि त्यामध्ये आम्हीं आनंद करितो!

अमेरिकेमध्ये दररोज तीन हजार असाहाय्य बालकांच्या गर्भपाताच्या माध्यमातून हत्या होतात, आणि येथे हजारो मंडळ्या बंद पडत आहेत, तरीहि त्या दूरदूरच्या भूमीत ख्रिस्ताचे कार्य वाढत आहे, आणि तरीहि त्यावर विजय मिळवू? देवाने त्यांना अधिक पालट झालेले लोक द्यावेत! ख्रिस्ताला ओळखणारे लोक आणि स्वत:हून त्याच्यासाठी कष्ट भोगण्यास तयार असलेले लोक द्यावेत, त्याच्या दुस-या आगमन समयी राष्ट्रांमध्ये लवकरच विजय साजरा होर्इल!

परंतू, प्रभात समयी मी तुम्हांस विचारतो की, “तुम्ही ख्रिस्तास ओळखता काय ? जो तुमच्या पापाचे मोल देण्यास कुरूप झाला, ‘जो मनुष्यजातीसारखा दिसत नव्हता’ त्याकडे कधी विश्वासाने पाहिले का - त्याच्यासाठी होय ! त्याने तुमच्या पापावर त्याचे रक्त शिंपडले काय, तुमचे नाव स्वर्गतील देवाच्या पुस्तकात नोंद झाली काय? ज्याने जगाचे पाप हरण केले त्या देवाच्या कोक-यांने तुमचे पाप त्याच्या रक्ताने धुतले काय? जर नाही, तर त्याच्या समक्षतेमध्ये तुम्ही ‘तुमचे तोंड बंद कराल’, आणि येशूला नमन कराल, आणि त्याचा तुमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्विकार कराल काय? हे तुम्ही आता करू इच्छिता काय?

कृपया उभे राहून तुमच्या कागदावरील गीत क्रं. 7 म्हणूया.

मानवी दोषाचा भयंकर भार तारकावर होता;
   वस्त्रानी गुंडाळलेला, पाप्यांकरिता मारला गेला,
पाप्यांकरिता मारला गेला.

मरणाच्या भयंकर वेदना भोगत तो रडला, त्याने माझ्यासाठी प्रार्थना केली;
   माझ्या दोषी आत्म्यास प्रीति केली व कवटाळले, जेव्हां त्यांस झाडावर खिळले. जेव्हां त्यांस झाडावर खिळले.

ही अदभूत प्रीति ! मानवी जिभेच्या पलिकडील प्रीति;
   प्रीतीचा विषय जे सार्वकालीक गीत असेल,
प्रीतीचा विषय जे सार्वकालीक गीत असेल.
(“वेदनेमध्ये प्रीति” द्वारा विल्यम विल्यम,1759;
चाल “अद्भूत गोडवा राजासनावर बसला”).
   (“Love in Agony” by William Williams, 1759;
      To the tune of “Majestic Sweetness Sits Enthroned”).

येशूवर विश्वास ठेवण्यासंबंधी व ख्रिस्ती होण्यासंबंधी जर तुम्हांस आमच्याशी वार्तालाप करावयाचा असेल, तर या सभागॄहाच्या पाठीमागे आता या. डॉ. कागन तुम्हांस शांत स्थळी नेऊन तुमच्याशी वार्तालाप करतील. कृपया आत्ताच जा. ज्यानी प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्यासाठी डॉ. चान, प्रार्थनेत चालवितील. आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

शास्त्रवाचन मि. अबेल प्रुढोम यांनी उपदेशापूर्वी केले:मत्तय 27:26-36.
हे एकेरी गीत मि. बेंजमिन किनकैड ग्रिफीथ यानी उपदेशापूवी गायले:
(“वेदनेमध्ये प्रीति” द्वारा विल्यम विल्यम,1759;
चाल “अद्भूत गोड राजासनावर बसला”)
“Love in Agony” (by William Williams, 1759;
sung to the tune of “Majestic Sweetness Sits Enthroned”).


रुपरेषा

परमेश्वराच्या सेवकाचे दु:खसहन आणि विजय !

(यशया 53 वर आधारित उपदेश क्रं. 1)
THE SUFFERING AND TRIUMPH OF GOD’S SERVANT!
(SERMON NUMBER 1 ON ISAIAH 53)

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“पाहा माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होर्इल, तो अत्युच्च होर्इल, ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्यासारखे नव्हते इतका तो विरूप होता.) त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांस दचकावयास लावील, राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करितील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.” (यशया 52:13-15).

(प्रे.कृ.8:34-35).

I.   प्रथम, आपण येशूने परमेश्वरासाठी केलेली सेवा पाहतो, यशया 52:13; फिलिप्पै 2:7; फिलिप्पै 2:9; प्रे.कृ. 2:32-33.

II.  दुसरे, येशू ख्रिस्ताने पापाकरिता केलेले अर्पण पाहतो, यशया 52:14; लुक 22:44; यशया 50:6; लुक 22:64; मार्क 15:15; योहान 19:1-3; यशया 53:12

III. तिसरे, ख्रिस्ताने देऊ केलेले तारण आपण पाहातो. यशया 52:15; 60:3,5; 49:12.